स्वप्नांत धुंद तुझ्या....
स्वप्नांत धुंद तुझ्या....
स्वप्नात धुंद तुझ्या मी
डोळे माझे जागेना,
आता तुझ्याविना जीव
माझा कुठेच लागेना....
तुझ्यातच मी माझं जग पाहतो
तुझ्यावर जीवापाड प्रेम मी करतो,
तुझ्या विचारात गुंग मी होतो
मी सखे तुझेच ग स्वप्न पाहतो....
रोजच माझे ग एक स्वप्न असते
त्या स्वप्नात मी तुलाच पाहतो,
तुझ्या या स्वप्नांच्या आधारावर ग
मी माझ जीवन जगतो.....
आभाळ प्रितीचे हे छान तुझे
स्वप्नात धुंद तुझ्या मन माझे,
भिरभिर फिरती उन्हाळमन माझे
तुझ्यात हरवून गेलो आता भान माझे....
माझ्या स्वप्नांचा आधार आहेस तू
या स्वप्नांना साथ देशील ना तू,
तुझ्या आयुष्याचा सोबती व्हायचय ग मला
माझी जीवनसंगिनी होशील ना तू...

