प्रेमावर आक्षेप...
प्रेमावर आक्षेप...
तुझ्या प्रेमाची गाथा लिहून लिहून
संपली माझ्या लेखणीची शाई,
तरी सुद्धा तू म्हणतेस की तू
माझ्यावर प्रेम करीत नाही...
अजून तुला किती देऊ मी
माझ्या प्रेमाचे पुरावे,
आता जणू प्रेमावाचून
कीर्ती रूपी उरावे...
तू नेहमी का घेत असते
माझ्या प्रेमावर आक्षेप,
मला तुझ्या बघण्याचा
आता बदललाय दृष्टीक्षेप...
बनवीन मी गं तुला
माझ्या जिवाची राधा,
हमी देतो तुला सखे
ना येणार प्रेमात बाधा...
तुला आता अजून मी कसे
समजावू माझ्या प्रेमाचे धड़े,
तू उगारतेस नेहमी माझ्या
प्रेमावर खड़े...
आयुष्यभराची साथ तुझी
द्यायला आहे मी तय्यार,
पण तू अशी का ग चालवते
माझ्या काळजावर हत्यार...
