Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Kamble

Romance Tragedy

3  

Pavan Kamble

Romance Tragedy

आज ती...

आज ती...

1 min
203


आज ती मला माझी कविता मागत होती

विचारलं तुला पाहिजे कशाला तर

बहाणे करीत होती...


आज ती थोडी वेगळीच वागत होती

कविमनाला माझ्या थोडं

निरखून पाहत होती...


आज ती माझ्याच दिशेने वाहत चालली होती

अरुंद अशी वाट ही आज

मला छोटी वाटत होती...


आज ती शब्दांशी माझ्या खेळत बसली होती

पाहून मजला का जाणे पण

ती गालात हसली होती...


आज ती मला माझी कविता मागत होती

कविता वाचताना ती अश्रू सांडत होती

अन पाहून मजला ओठांवरती हास्य मांडत होती...


आज ती मला माझी कविता मागत होती...

कवितेच्या प्रेमात ती गुंतून जात होती...

हृदयातील कोऱ्या कागदावर ती माझं प्रेम मांडत होती...


आज ती मला माझी कविता मागत होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance