महती
महती
तात्या, गावाला जगवूनं
गेलात तुम्ही निघून,
डोळ्यातील अश्रू आमच्या
आटले नाहीत अजुन...
तुम्ही गेलात यांवर आमचा
अजून ही विश्वास बसत नाही,
भिरभिरते नजर ही शोधात तुमच्या
तुम्ही कुठेही दिसत नाही...
करणार असं चुकीचे काही
असं कधीच वाटलं नव्हतं,
थोडंसं च पण निर्मळ, ग्रेट
तुम्हा हे आयुष्य भेटलं होतं...
झऱ्यासारखं हसत खळखळत
निर्मळ आयुष्य जंगलात,
जगाला वाटेल हेवा असेच
फार स्वाभिमानाने लागलात...
चारचौघात होताच रुबाब
होताच निराळा मानसन्मान,
जगच सोडून गेलात सारं
कधीच कुणापुढे नाही झालात लहान...
दिलदार मन नी दसरा, दिवाळी
होता जरी खिसा फाटका
नको तिथे धावून गेलात
केला नाही संसार नेटका...
जगा प्रमाणे बायको लेकरांचा
केला नाही कधी विचार,
कधीच कुणाला दुखावलं नाहीत
जगला नाहीत होऊन लाचार...
>
कन्याकुमारी ते काठमांडू
जग हे सारं च फिरलांतं,
गावच्या, माणसाच्या प्रेमापोटी
मागे तुम्हीच फिरलात...
या इथल्या स्वार्थी जगाला
गरज तुमची फार होती,
मावळला हा सूर्य आणि
अंधार झाला इथे किती...!
कसं विसरावे तुम्हा
रोज आठवण येती,
ओळखण्यात चुकलात
खरी खोटी नाती...
कोठून आणू शब्द
नी लिहू तुम्हावर किती ?
शब्दांत काय वर्णवू मी
तात्या तुमची महती...
अमर होतात नी अमर तुम्ही
तुम्हा न आले मरण वरलं,
तुम्ही जगवलांतं ज्यांना, ज्यांना
त्यांनी च तर तुम्हा मारलं...
मीच काय तात्या...
तुम्हा कोणीच विसरू शकत नाही
किती ही हाताने झाकला तरी
सूर्य कोणीच झाकू शकत नाही...!
फार आहेत उपकार ह्या जगावर
ते कोणीच फेडू शकत नाही...
डोळ्यातून जे अश्रू येती
ते मी रोखता रोखू शकत नाही...!