Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Raosaheb Jadhav

Horror


4.3  

Raosaheb Jadhav

Horror


बाप गेल्यानंतर...

बाप गेल्यानंतर...

1 min 20.9K 1 min 20.9K

दाखला मृत्यूचा मिळताच

पडला कंस

बापाच्या नावाला

७-१२वर

आणि झाले हस्तांतरित

पोटखरड, नाड्यापुड्या,

बागायती तुकड्यांसह

राखत अबाधित वारसाहक्क...


मी मात्र उगाच उलगडू लागलो,

मेंदूच्या घड्या,

शोधत समृद्ध सूत्रे

कंस सोडवण्याची...


आणि

सोबत घेऊन उठलो

एक साक्षात्कार

गणित कच्चेच असल्याचा,

गेल्या पिढ्यांसारखाच

घेऊन मस्तकावर

ओझे नोंदींचे...


Rate this content
Log in

More marathi poem from Raosaheb Jadhav

Similar marathi poem from Horror