STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Inspirational

4  

Raosaheb Jadhav

Inspirational

भिंग

भिंग

1 min
407

भिंग


बांधून घेतलाय मी बुबुळांवर

एक भिंग

आणि सुटत गेल्यात मागे

सुक्ष्मदर्शक यंत्राच्या पुढल्या कित्येक पिढया...


साध्या सर्दीने बेजार झाल्यावरही

मी शोधत राहिलो

रक्ताच्या कणाकणात

माझ्या रक्तपेशींवर हल्ला करणाऱ्या विषाणूंचे अस्तित्व...


आणि कधीतरी

चवदार दह्याच्या आम्लतेत वाढ करणारे

सूक्ष्म जिवाणूही...


का कुणास ठाऊक

हल्ली मी

डोळ्यांची रचना अभ्यासत बसलोय

तुझ्या नजरेपेक्षा

जेव्हा कळले मला

दुरावलीस तू

नजरेच्या टप्प्यातून

धडधड काळजाची मंदावल्यावर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational