STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Inspirational

5.0  

Raosaheb Jadhav

Inspirational

मला वाटतेय...

मला वाटतेय...

1 min
936


मला वाटतेय...


गुरुत्त्वाच्या वैश्विक आकर्षणाइतकीच असणार

नैसर्गिक ओढ आपल्यातही

इच्छा अनिच्छेच्या छेदनबिंदूभोवती घुटमळत

अंतरच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणाचे तोरण माथ्यावर बांधून

स्वतःला बिंदुरुप वस्तुमानाच्या

समजूतसूत्रांमध्ये गुंतावताना... ...

विश्वाच्या पसरटपणाला भोवणारा गतीचा शाप

मात्र तोडू शकतो ओढही गुरुत्त्वाची

मग कितीही केली बेरीज वस्तुमानांची

किंवा वर्ग अंतरच्या गुणकाराचा

तरी गतिमानतेत हात सुटण्याची भीती दाबत

जगण्याला कुरवळण्याचा दुबळा प्रयत्न करताना

कच्च्या आकडेमोडीत गुंतवलेली सूत्रे

उकलू लागतात निष्कर्ष ओढ गमावल्याचेच...


... कृष्णविवरांच्या मृत्यूकथांतून

नव्या ताऱ्याचे जन्मरहस्य शोधताना

आकाशगंगेच्या विशालपणात माथा गुंतवून

ब्रह्माण्डाचा पिंड गमावला जाण्याची भीती

नाही वाटत तुला? ....

मला वाटतेय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational