घटल्या आणेवारीची...
घटल्या आणेवारीची...
घटल्या आणेवरीची...
काळजाची उगवणक्षमता मोजताना
केलेच होते ना तू
मेंदूतील पोषणघटकांचे प्रमाणीकरण
मातीपरीक्षण केल्याच्या थाटात
पेरण्याआधी...?
तरीही
ह्या घटल्या आणेवारीची जबाबदारी
स्वीकारलीच पाहिजे तू
असे नाही म्हणणार मी...
तसेही तू फोडू शकतेस खापर
हवामान बदलावर,
आगंतुक आलेल्या रोगांवर,
अंगी न लागल्या खतांवर,
पाण्याच्या गुणवत्तेवर
किंवा निष्फळ निष्कर्ष संकेत देणाऱ्या
गणिती रितिभातीवरही...
पण खरं सांगू?
खाऊ शकते मातीबी 'बी' कधीकधी
चल,
नांगरूया पुन्हा
अंग निराशेचे...
