आखाजी
आखाजी
1 min
552
आखाजी
सण आला आखाजीचा
झोका बांधून झाडाला
केळी घागरीत पाणी
थंड करते उन्हाला...
लेक आली माहेराला
ऊन हसते गालात
झाड डफळे आंब्याचे
दडे मोहर फळात...
गुरे वासरे वाघुळे
गोड जिभांनी सावली
बालपणाच्या झोक्याला
गूज सांगते माऊली...
गूज सांगता सांगता
डोळे डबडब ओले
बालपणाच्या उरात
फळ मोहराचे झाले...
