STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Others

5.0  

Raosaheb Jadhav

Others

साहित्यकणा

साहित्यकणा

1 min
408



शोधत जाऊ कणाकणांतून

जाणिवांच्या खुणा

मिळेल येथे साहित्याला

मानवतेचा कणा

हा आपला साहित्यकणा... धृ


झेपावण्याला मिळेल आकाश

पंख हवेत ज्याला

ढग होऊन बरसेल खुशाल

उरात ज्याच्या कळा

ओलावलेली मिळेल माती

अंकुरण्या अन कोणा

हा आपला साहित्यकणा...१


बोली फुलांना देईल कोणी

फुलपाखरांना रंग

न्हाऊ घालून सजवील

कोणी समीक्षेचे अंग

शब्दच होईल रसिक येथे

जपत साहित्यपणा

हा आपला साहित्यकणा...२


मंथनातून मनामनंच्या

होईल समाजचिंतन

उभार होईल समाजकार्य

सत्कार्याची गुंफण

शोधक बोधक सहृदयातून

एकपणाने म्हणा

हा आपला साहित्यकणा...३


सजवील ऋतू पानगळीचे

हिरवे होऊन कोणी कोणी

अचपळ, कोणी अवखळ

बाललीलांचे धनी

मनामनांचे होईल पोषण

अक्षर सकसपणा

हा आपला साहित्यकणा...४



Rate this content
Log in