STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Horror

3  

कुमार भयकथासूर

Horror

वाड्यातील ती रात्र (एक भयकविता )

वाड्यातील ती रात्र (एक भयकविता )

1 min
420

अंधारलेल्या वाडयात पडले पहिले पाऊल.....

मनामध्ये उठली भीतीची पहिली चाहूल.....

काळ्या पडलेल्या भिंती आणि जमीन.....

सर्व ठिकाणी अंधार वाटेल तिकडे थांबीन.....

घोघावत आली एक झुळूक सोबत घेऊन केर....

भीतीची दिवटी मनात धरू लागली फेर.....

असाच अंधारात तो मला दिसला.....

पण मला पाहण्याचा त्याचा प्रयन्त मात्र फसला....

गोरा गोमटा चेहरा त्याचा लाल होते डोळे....

केस त्याचे काळे आणि मोठे होते सुळे ....

छताला उलटा लटकून पाहत होता सर्वीकडे.....

जणू लागला वास त्याला त्याचे भक्ष आहे इकडे ....

भीत भीत मी हळू हळू सरकत होतो पुढे.....

पण मला जाणवत होते त्याचे लाल डोळे रोखले होते माझ्याकडे.....

अचानक झडप घालून घेतला माझ्या गळ्यचा चावा .....

काही केल्या मला सुटता येईना ना करता येईना कांगावा....

आता मी सुद्धा असतो त्याचा सोबत तिकडे .....

कोणी आहे जो भागविलं आमच्या रक्ताची तहान या बरं इकडे ....

तुमचे रक्त पिऊन करू तुम्हाला आमच्या सारखे ....

नाही राहणार मग आम्ही तुम्हाला परके .....

वाडा आहे अंधारलेला वाट पाहतो आहे तुमची ......

तुम्ही आलात तर मौज होऊन जाईल आमची ......

रात्रीचा आमचा संपला थरार... 

आता होईल पहाट मग संपून जाईल अंधार ... 

उद्या रात्री पुन्हा येऊ आम्ही ......

आमचा साठी नवीन सावज होणार का तुम्ही .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror