STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Horror Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Horror Tragedy

जातोय सोडून सारं

जातोय सोडून सारं

1 min
293

नको कुणाला त्रास म्हणून 

मी जातोय थोडा दूर ,

माफ करा मला ...

होतेय चूक फार..


दोष कुणा का देऊ...

तुम्ही तर माझे सारे

सारे माझेच असताना

मीच मानली हार.


वाईट नाही काही

हे मरण मला आवडले

तुमच्या साठीच मी

हा केला सारा विचार.


आहे एकदा जाणे

मी जातो गडया खुशाल,

नको थोडही माझं

हे ओझं कुणावर.


झाली माझी सुटका

मला आनंद खरा आहे

तुम्ही दिलात हा आनंद

मी नशीबवानच फार.


नको कुणाच्या वाटयाला

नको दुःख कोणाला

तुमच्या सुखापायीच

मी जातोय सोडून सारं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract