सोडली नाही साथ...
सोडली नाही साथ...
सोडली नाही दुःखाने साथ
आयुष्य संपले सुखाच्या शोधात,
झुरतो जीवाला दिनरात
दाटला काळोख हा जीवनात...
कोणीच नसतं आपलं
नसतोच कोणी खरा,
दुनिया ही सारीच
स्वार्था चा पसारा...
गरज सरो नी वैद्य मरो
कामा पुरता मामा,
हाच येतोय अनुभव
रोजच तुम्हा नी आम्हा...
येता तुम्हावर वेळ
जाती सारेच दूर,
ओळख देईना कोणी
केले जरी उपकार...
ओळखून जगाला
वागावे जगात,
हीच रीत जगाची आहे
गोड तुमचे रगत...
होतो कुठे न्याय
साथ कुणाची असते?
अं
धारात सोबतीला
सावली ही नसते...
किती जरी कोणावर
ओवाळीला जीव,
जीवावर तुमच्या उदार
तुमचंच घेऊन नाव...
कसं जगावं जगात
ती रीत कळाली नाही,
संकटात खरी कुणाची
साथ मिळाली नाही...
जगलो शोधात सुखाच्या
जे अजूनही मिळाले नाही,
ते दुःखच माझे आहे
ज्याने साथ सोडली नाही...
नाही मला दुःख
दुनिया सोडून जाण्याचे,
कळले नाहीत रंग
सारे अजून माणसाचे...
मी म्हणतो ज्याला माणूस
ते माणसं आहेत का?
माणसाने माणसाला
द्यावा किती धोका...