व्हावा साजरा सण...
व्हावा साजरा सण...
कोणी गोडधोड खातो
कोणी उपाशीच राहतो,
घरोघरी लाडू फराळ
कोणी फुटपाथवर निजतो.
दिवे, झगमगाट रोशनाई,
किती फटाके वाजती,
झोपडीतला अंधार
गरीब अंधारात निजती.
कोणाची दिवाळी
निघे कोणाचे दिवाळ,
उपाशी तापाशास
द्यावा दोन घास फराळ.
दिले देवाने ज्याला
त्याने करावे दान,
अश्रू पुसावे दिनाचे
व्हावा साजरा सण.व्हावा साजरा सण...
'. पुष्पाग्रज '
कोणी गोडधोड खातो
कोणी उपाशीच राहतो,
घरोघरी लाडू फराळ
कोणी फुटपाथवर निजतो.
दिवे, झगमगाट रोशनाई,
किती फटाके वाजती,
झोपडीतला अंधार
गरीब अंधारात निजती.
कोणाची दिवाळी
निघे कोणाचे दिवाळ,
उपाशी तापाशास
द्यावा दोन घास फराळ.
दिले देवाने ज्याला
त्याने करावे दान,
अश्रू पुसावे दिनाचे
व्हावा साजरा सण.