आम्हां कशाची दिवाळी...
आम्हां कशाची दिवाळी...
आम्हा कशाची दिवाळी
त्या दुष्ट देवाला आमची
नाही दयामाया आली,
सोडून आई माझी गेली
आम्हा कशाची दिवाळी ?
कोसळला दुःखाचा डोंगर
धार डोळ्याला लागली,
वेळ आम्हावर ही आली
आम्हा कशाची दिवाळी ?
केले कित्येक नवस
रोज प्रार्थना आम्ही केली,
वाया सारी मेहनत गेली
आम्हा कशाची दिवाळी ?
कशाचा आला देव
नाही आम्हा वाली,
कुठे शोधू माय माऊली?
आम्हा कशाची दिवाळी?
झाला जीवनात अंधार
आकाश दिवा कसा लावू?
कशी काढावी रांगोळी?
आम्हा कशाची दिवाळी?
गेली माय माझी लक्ष्मी
करु कशे लक्ष्मी पूजन?
झाली स्वप्नांची होळी
आम्हा कशाची दिवाळी?
उटणे आई लावायची
लाडू, करंज्या करायची,
आठवण आईचीच सगळी
आम्हा कशाची दिवाळी ?
गायकवाड रवींद्र गोविंदराव
दापकेकर