ही रीत जुनीच आहे...
ही रीत जुनीच आहे...
सोडून द्यायची साथ
नी धरून ओढायचे पाय,
ही रीत जुनीच आहे
कोणाला कळणार नाय...
आहे कुठे भरोसा
कोणाचा कोणावर,
वनवासाला जाते
खऱ्या ची च माय...
विश्वास च उडाला
आज स्वतः वरचा,
जगात आता कुठे
उरला आहे न्याय...
नातं च नाही उरलं
दुनियेच्या बाजारात,
जन्मूनी त्यांच्या पोटी
ओळखीना बाप माय...
पाण्याची किंमत
कुठले दूध, तूप...
चुलीवर च्या द
ुधाला
येईल कोठून साय...
गाय वासराला
येतोय का पान्हा...
शोधात वासराच्या
का हंबरते गाय...
नाही देणे घेणे
संपून सारे गेले,
कोणी येथे कोणाला
ओळखत नाय...
बुडणार जग आहे
आपल्याच पापाने,
लुटुन सारी दुनिया
नेणार कोण हाय...
आहे रे माणसाचे
मातीशी च नाते,
नको हवेत राहू
ठेवा जमिनीवरच पाय...
गायकवाड आर.जी.
दापकेकर जि.नांदेड