पैशाचा बाजार...
पैशाचा बाजार...
का भरला होता अर्ज
का घेतला माघार?
उघडत नाही तोंड...
सारा पैशाचा बाजार...
विचारा मनाला
फसवता कुणाला,
विश्वासघात करता
होऊन लाचार...
कशी कळली किंमत
नव्हतीच मुळी हिंमत,
स्वाभिमान विकला
होऊन बेजार...
विचारीना कोणी
कोठून मिळेल लोणी,
याचंच जाई मढ
म्हणून मानली हार...
उद्देश हाच होता
नावाचा च नेता
विकल्या गेल्या फुकट
करण्या आधीच वार...
नसतं कोणी पाठीशी,
देती दगा स्वतःशी
स्वार्थापोटी स्वतः चा
मांडतात बाजार...
डिपॉझीट तुमचे
आधीच जप्त होती,
झोळी भरून घेऊन
झालात कुठे पसार..?
तुमचेच तुम्हाला
कळले असेल राजकारण,
ओळखतात लोकं
म्हणून तुम्हा गद्दार...
कवडीमोल किंमत
तुमची होती, आहे
दलालांच्या टोळ्या
सारा काळ बाजार...
लाडके कोण इथे
काय तुमची योजना?
फसलात स्वतःच
खोदून तुम्हीच गटार...
बाजार भरलेला
दिसतो जनास सारा
म्हणती सारे गद्दार
यालाच दरबार...
कोण आहे कुणाचे
कोणास नाही ठावे,
निशाणी कोणास नाही
बाप यांचे हजार...
गायकवाड आर.जी.
