आई वडीलांचा आशिर्वाद
आई वडीलांचा आशिर्वाद


नसते आईबाप तर
तुझा जन्मच झाला नसता ,
सांग बरं तुला
जन्म कोण दिला असता...?
मिळाली असती का ?
ही दुनिया पहायला ,
मोठं होण्यासाठी
खायला प्यायला.
कोण शिकविले ?
चालायला बोलायला,
जमलं असतं का ?
शिकून मोठे व्हायला...
आई बाप दुनिया
तू दुनिया आई बापाची,
सात जन्म नाही होत
फेड त्यांच्या ऋणाची.
आई बापाने आपल्यासाठी
सांग काय नाही केलं ?
झिजविला देह
रक्त आठवीलं .
लालन पालन केलं
केलं लहानाचं मोठं,
राबून दिनरात
भरले तुझे पोट.
जीवापाड जपलं
केला सांभाळ ,
हो कितीही मोठा
त्यांना तू बाळं...
तूच असे त्य
ांचं
जगणं मरणं,
मुलं बाळं हेच
आई वडिलांचं जीवन.
ह्या आपल्या देवाला
आपण कसं विसराव ?
आईबाप म्हणजे
असे दुसरा देवं.
फिटतील का सांगा
आई बापाचे ऋण,
धन्य हो बाळा
कर स्वप्नं त्यांचं पूर्ण.
जन्मभर करावी
सेवा आई बापाची ,
ठेवूनी या जाणं
मात्या पित्याच्या ऋणाची.
व्हावे जीवन सार्थक
नको करु पाप
भेटतील का पुन्हा?
गेल्यावर आई बाप...
चरणी त्यांच्या
टेकवावे डोकं,
नाव व्हावं मोठं
हो लाखात एक...
नको पापाने
जीवन बरबाद,
असावा पाठीशी
आईवडीलांचा आशिर्वाद...
गायकवाड आर .जी.
दापकेकर जि.नांदेड