दुःख सांगावं कोणाला...
दुःख सांगावं कोणाला...
दुःख सांगावं कोणाला...
सारी नाती स्वार्थी
कोणी पडेना वेळेला
प्रश्न पडला मनाला
दुःख सांगावं कोणाला...
बोलतात सारे गोड
गरजेनुसार चाले लाड,
गरज सरो वैद्य मरो
विचारीना कोणी कोणाला...
वेळेपुरती मैत्री
नी गरजेपुरती नाती,
करा कितीही धावा
भजा किती ही जनाला...
नाती ओळख देईना
मित्र जवळ येईना,
संकटात कधी कोणी
साथ देईना आपणाला...
नाही भरोसा कोणाचा,
येईना कोणी धावून,
दुःख आपलं मोठं नी
हसू वाटे जनाला...
कोणी जाणीना उपकार,
बेईमान जग सारं
लोकांना सारं अर्पून
पश्चात्ताप होई मनाला...
चमचेगिरी,हांजीहांजी
नको त्यांच्या करती पुढे ,
उचलती हरामाचे जोडे
सजा इथे सज्जनाला...
गायकवाड आर.जी.
दापकेकर जि.नांदेड
