शोध सुखाचा...
शोध सुखाचा...


शोध सुखाचा
'. पुष्पाग्रज '
सापडला नाही ज्यांना मार्ग धम्माचा,
संपलेला नाही त्यांचा शोध सुखाचा....
तृष्णा, वासना,लोभ,लालच
सोडून नाही दिली,
साऱ्या दुनियेची दुःख त्याच्या वाट्याला ही आली.
कळले नाही करु नये कधीच तिरस्कार कोणाचा...
पंचशीलाचे पालन ज्यांनी
मुळीच केले नाही,
जीवन म्हणजे काय त्यांना
कळून वळले नाही,
कळला नाही अर्थ त्यांना
अहिंसा, सत्याचा...
अष्टांग मार्ग काय तयांना
सांगा आता कळतो
दगडाला जे देव मानती,
देव
कसा तो मिळतो.
विसर पडला कसा जगाला माणसातील देवाचा...
धर्म मानवतेचा
विसरून मानव गेला,
नद्या रक्ताच्या वहाती,
माणूस हैवान झाला
विसर पडला कसा
जीवन मूल्यांचा...
समजलाच नाही अजून
खरा तो धम्म
मिळे फळ तयाला
जैसे ज्याचे कर्म
संपलाच नाही हिशोब
पाप पुण्याचा...
सोडूनी या मार्ग दुष्कर्म जे करती,
कसे होईल तयाचे भले
काय त्यांची किर्ती?
लाभणार नाही पुन्हा
हा जन्म माणसाचा...
गायकवाड आर.जी.
दापकेकर जि.नांदेड