दुःखाची च साथ
दुःखाची च साथ
दुःखाची च साथ...
नाही लागला शोध सुखाचा
या जीवन अंधारात,
आयुष्याला आहे खरी
या दुःखाची च साथ...
जगलो आशेवर आजवर
घेऊन स्वप्ने हजार,
सारी स्वप्ने अधुरी
पाणी चाळणीत...
बुडत्याला काडीचा आधार
ती आधाराची काडी च
झाली निराधार
झाली आज ही गत...
करावा कुणाचा धावा
धावून जीव जावा,
हे नको आहे मला
गुडघ्यावर टेकले हात...
कमी पडले प्रयत्न
मला हे पटले नाही,
मिटतील डोळे आता
जाईल विझून वात...
शोधात प्रकाशाच्या
चालून इथवर आलो,
मावळला सूर्य
झाली अशी ही गत...
द्यावा प्रकाश जगाला
हे स्वप्न माझे होते,
पाहून अंधार सारा
डोळे मिटतात...
चालले जग कोठे
तुम्ही च आता पाहा,
मज विट आला जगाचा
नाही माणूस माणसात...
शोधात माणसाच्या
मी वेडा झालो होतो,
समजून मला आले
नाही माणूस इथं...
जातोय जीव कोणाचा
नाही कुणा खंत,
तुमच्या च हाताने रे
होई दुनियेचा अंत...
गायकवाड आर.जी.
दापकेकर जि.नांदेड