कधी सुख मिळणार?
कधी सुख मिळणार?


कधी सुख मिळणार?
'. पुष्पाग्रज. '
प्रश्न आहे लई मोठा
कसं होईल जीवनाचं?
उभा दुःखाचा डोंगर
कुठे ठिकाण सुखाचं ?
कसं पचवावे किती
जीवनभर दुःख,
नाही भेटलं कुठेही
शोधून शोधून सुख.
मरणाच्या दारी आलो
त्या शोधीत सुखाला,
सुख असतं ते काय
कोणी सांगावे मला.
जगलो सारं आयुष्य
दुःख एवढे झेलीत,
सुखासाठी तरसलो
रोज अश्रू ढाळीत.
त्या सुखाला यावी किव
सुख वाट्याला ते यावं,
गेला जन्मच दुःखात
सुख मानून काय घ्यावं?
दुःख दुसऱ्याचं
कसं कुणास कळणार?
दीन दूबळ्यांस
कधी सुख मिळणार...?
गायकवाड आर.जी.
दापकेकर जि.नांदेड