उपदेश...!!
उपदेश...!!
उपदेशाचे डोस प्यालो मी बहुत
झाले की अजीर्ण आता देवा
वाटतो कारे तुम्हास ही हेवा
लेखणीस माझ्या देतो हो विसावा
देतो हो विसावा...!!
तरी धन्यवाद करितो सर्वांना
दिला परवाना लिहण्याचा
असू दे की आता असेल ते असेल
प्रयत्न हा माझा छंद जपण्याचा
छंद जपण्याचा....!!!
मोदक अनुमोदक बहुत लाभले
जाता जाता हात की धुतले
वाहत्या गंगेत स्नानही केले
झाले मन निर्मळ जाऊ दया की
जाऊ दया की....!
