STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract Others

3  

Prashant Shinde

Abstract Others

पोटासाठी...!

पोटासाठी...!

1 min
14.3K


पोटासाठी सारे काही

डोक्यात एकच विचार कामाचा

दाम सदैव लाभतो बाबा

जो असेल खऱ्या घामाचा


सूर्याला कधी पाहिले नाही

तडक सुरुवात श्रमदानाची

बुडत्या रविलाही बाय बाय केले नाही

हीच पद्धत आमच्या कामाची


काम काम अन काम

सदा ध्यास निव्वळ कामाचा

तेव्हा कोठे मिळतो

योग्य मोबदला आमच्या घामाचा


घड्याळालाही पाहिले नाही

या अंग मेहनतीच्या कामाने

रोजच अंघोळ झाली आमची

निथळणाऱ्या घामाने


आज रवी राज बुडाला

आम्हाला तो दिसला नाही

डोळ्यात बोटे कधी गेली

तेही बाबांनो कळले नाही


गाठीला गाठ मारता

गाठ कामाची सुटली नाही

राबण्याची रित अशी

कोणालाच अजून उमजली नाही


सौख्य समाधान शांती

या कामातून आम्हाला मिळते

झोप चांगली रोजच आम्हाला

पडता पडता सुखाची लागते....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract