STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Abstract

3  

Dnyaneshwar Bhoyar

Abstract

पाणी

पाणी

1 min
13.9K


काळ्या काळ्या ढगात

गुपित दडलंय तरी काय

गार गार हवेत

सरसर कुणाचे वाजती पाय ||


टपटप मारा अमृतधारा

झुळूक झुला कुणी खेळला

वाकड्या तिकड्या पायाने

माती रेख कुणी काढला ||


लख्ख लख्ख उजाळा

मागे आवाज येतो कुणाचा

आई म्हणाली बाळा

हा खेळ नित्य पाण्याचा ||


काळ्या निळ्या रंगात

ढग धावती कसे नभात

नदी वाटे शुभ्र पाणी

रंग तयांचे हरवूनी ||


मजेमजेचे कोडी किती

मज एक ठाव असे

नाचू बागडू आनंदाने

पाणीच पाणी छान दिसे ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract