STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Romance

3  

Dnyaneshwar Bhoyar

Romance

प्रेमांकुर

प्रेमांकुर

1 min
713


एक चांदणी रूपाने देखणी

ओठांवर हास्य करून मन मोहिनी

नजरेतून कशी काळजात गेली

कट्यार हृदयात कधी शिरली ||१||


नयनांची ही कमाल न्यारी

शोधती का मृगजळ दारी

मन हे पण हरवून गेले

शोधताना स्वतःच हरले ||२||


नजरेचा वेध घेऊन

मन घायाळ कधीच करून

स्वप्नांची मग उधळण करून

गेलीस का हे गीत गाऊन ||३||


ओढ लावती ह्या पाउलखुणा

किती सावरू धुळ कणांना

मी नभी लावून पंखांना

शोधत आहे दिवास्वप्नांना ||४||


तु आहे असेच भासते

गढूळ धारा वाट काढते

नयनांची का ही आस असते

साठवून तरी का तुलाच शोधते ||५||


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance