तु होतीस तेव्हा
तु होतीस तेव्हा
1 min
268
तु होतीस तेव्हा
मन स्वैर आकाशी रंग अती
वाटेवरती त्या चार पावलांच्या
धुळखुणांचा आजही शोध किती ||
तु होतीस तेव्हा
हात हाती धुंद रात्री
भ्रमण काजव्यांचे पंख नवे
तम निशेत चंद्र साक्षी ||
तु होतीस तेव्हा
गुंफण अबोल भावनांचा खेळ
साद घालती खग गुंजती
चातका सम ही मृगतृष्णा ||
तु होतीस तेव्हा
आधार तुझ्या फक्त असण्याचा
या क्षणी स्वैर भटकंती
शोध अखेर आस नयनांची ||