रोज एक नवीन दिवस
रोज एक नवीन दिवस
लपंडाव नित निशा उषेचा
अविरत खेळ चालतो गतीचा
नव्या पहाटे रवी किरणांसंगे
नवा प्रकाश दृश्य जीवनाचा ||
अवखळ जराशी खंत मनात
सावरायला हवा आजच हात
स्तंभासम ना क्षण एकेक
साकारा उद्याची सुरेख बात ||
नवचेतना दार प्रयत्ने फार
नित्य त्रागा बंधने मोहित
घाव झेलता पाषाणे आकार
सृष्टी रक्षणा करा नियमित ||
अवघे जन आप्तची सारे
तंटा नसे ना भेद काया
सुजीवन तव सार उद्याचा
दैनंदिन सत्वरी राहो घडाया ||