STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Inspirational

3  

Dnyaneshwar Bhoyar

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
13.7K


कौतुक जगी तयांना नवल

महिमा अगाध माझ्या विठूचा

वारी आषाढ कार्तिक एकादशीची

नभांत गुंजतो गजर हरिनामाचा ||


चंद्रभागेच्या तीरी भक्तांचा मेळा

विठ्ठल विठ्ठल मृदुंग वदला

गळा टाळ वीणा वारकरी

पावलीचा खेळ भान हरवला ||


जपनाम राम कृष्ण हरी

शमली भूक माया संसाराची

लळा जडे विठू माऊलीचा

नजरेला आस धूळ पावलांची ||


आळंदी देहू शेगावीचा राणा

नित्य दिंडी पायी भेटायला

पांग फेडाया सार जीवनाचे

दिव्य शोभे रिंगण माला ||


युगे अठ्ठाविस तप विठ्ठलाचे

पुंडलिकाच्या भेटीस वाट सदैव

नामदेव चोखा मीरा जनाबाईचे

विठ्ठल नामी रमले नित्यभाव||....


Rate this content
Log in