बालगीत (माझे सखेसोबती)
बालगीत (माझे सखेसोबती)
1 min
14.9K
कावळे दादा कावळे दादा
काळा रंग तुझा किती घट्ट
खारू ताई बघ हासली
सरसर चढे डोळे केले मिट्ट ||
पोपट काका पोपट काका
हिरवा रंग तुझा किती छान
मिरची ताई बघ लपली
पानातुन पाहे उंचावून मान ||
उंदीर मामा उंदीर मामा
पांढरा रंग दिसे दातांचा
मनीमाऊ हळूच का दबकली
गोंडस दिसे फुगा शेपटीचा ||
मैना मावशी मैना मावशी
टिपले दाणे गाणे गाऊन
लाल रंग भरून डोळ्यात
सकळ ऐकती लावून कान ||
दादा काका मामा मावशी
सारे माझे हे सखेसोबती
काळा हिरवा लाल पांढरा
रंगात वाटे मौज किती ||