Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Dnyaneshwar Bhoyar

Drama

3  

Dnyaneshwar Bhoyar

Drama

अंगाई गीत

अंगाई गीत

1 min
8.3K


अंगणात उतरले रात चांदणे

झोप रे सानुल्या बाळा

मी गाते तुझ्यात रमते

कधी कळेना जीवा लळा ||


तुझ्या डोळ्यात मज पाहती

स्वप्ने उद्याची का भाळती

सौख्य लाभो जीवनाचे तुला

हृदयी श्वास बघ दाटला ||


धनी राजा होऊन सत्वरी

कीर्ती वाढो तुझी भूवरी

सारं जगणे गीत माझे

पदरी वेचते संकटे तुझे ||


दोन जीवांचा खेळ मांडला

तुझ्या संगे संसार थाटला

कंप काया धरी आसरा

निज सुखे झेप अंबरा ||


Rate this content
Log in