STORYMIRROR

kishor zote

Abstract

3  

kishor zote

Abstract

हा छंद तुझा ( हायकू )

हा छंद तुझा ( हायकू )

1 min
28.2K


हा छंद तुझा

वेड लावी या जीवा

धुंद ही हवा...


सदा विचार

असतो तो तुझाच

हात रिताच...


तोच गुलाब

सापडला पुस्तकी

लागे उचकी...


आहे श्वासात

गंध फक्त तुझाच

ही कस्तुरीच...


प्रत्येक क्षण

हळुवार जपला

स्मीत हसला...


वाट थांबली

ती क्षितीजावरची

ना परतीची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract