STORYMIRROR

kishor zote

Abstract

3  

kishor zote

Abstract

झेप तीच्या कर्तृत्वाची

झेप तीच्या कर्तृत्वाची

1 min
29K


( अष्टाक्षरी )

सर्व क्षेत्र पादाक्रांत

केली आहे आज तीने

कोणताच प्रांतअसा

नाही सोडला हो स्त्रीने

माता जिजाऊ सावित्री

पाही जग आदर्शाने

वैर नाही कधी मनी

बदलावे समाजाने

घर नोकरी सारेच

हाताळते शिताफिने

उंच भरारी घेतली

तीच्या अधुऱ्या स्वप्नाने

कला साहित्य संस्कृती

रुजवली कौशल्याने

डंका तीचा वाजतोय

असा या दश दिशेने

कोण रोखणार तीला

आता बळजबरीने ?

झेप तिच्या कर्तृत्वाची

वंदिलेय नियतीने !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract