वैर
वैर
सुकली बाग केव्हाचीच
तुटले नाते धरतीशी
किलबिलणारे पाखरेही
गेलेत निघून परदेशी
इथल्या व्यवस्थेची शृंखला
गेली कधीची पोखरून
नात्यातील प्रेमाचा बांध
तुटला अर्थाशी भांडून
समतोल ढासळता बिघडतो
कैक जीवाचा ठोका
कमानीतुन सुटता बाण
साधून घेतो मोका
सुखाच्या अश्रूंशी पापणीचे
कधीच नसते वैर
दुःखाचा हुंकार फोडता
गंगा-यमुनेत नसते वैर.
