आयुष्य
आयुष्य
1 min
14.1K
जगण्याचा झंझावात
दिनरात पेटतो आहे
आयुष्याला पुन्हा एकदा
नव्याने सजवतो आहे
लाख तुकडे जरी केले
माझ्या मनाचे वैऱ्याने
घर बांधून देणार मी
तुकडे जोडून प्रेमाने
बोलते झाड आता वैरी
श्वास इमारतीत गुदमरे
गहाण ठेवली माणसाने
माणुसकीची केव्हाच दप्तरे
काळ्याकुट्ट ढगातला पाऊस
केला मुका इथल्या प्रजेने
ग्लोबलवॉर्मिंगच्या झळा
किती सोसाव्या वसुंधराने
माय झाली डिजिटल
लेकरू दुधासाठी तडफडे
फिगर मेन्टेन करण्यात
अख्खे आयुष्य कमी पडे.
