STORYMIRROR

GANESH MANKAR

Tragedy

2  

GANESH MANKAR

Tragedy

शाई

शाई

1 min
2.6K


जोडतो उगाचच मी

स्वप्नाची कवाडे नवे

चौकट मोडणारे ते

रडतांना मी पहावे

वेदनाच झाल्या मुक्या

फुकटा इलाज वैरी

असंगाशी ती सलगी

माय-लेक होतो वैरी

कशाला हाक मारतो

तुझ्या कर्माचेच भोग

बोटे चोळून-मोडून

मरणाचा नाही योग

पापाचा घडा भरला

येथेच रिता होईल

चित्रगुप्ताचीही पण

लेखनी -शाई शमेल.


Rate this content
Log in

More marathi poem from GANESH MANKAR

Similar marathi poem from Tragedy