पण
पण
माझ्या मनातील पण
सख्या तुच ओळखावा
जाई जुईचा गजरा
माझ्या जुळयात बांधावा
काहुर वेदनेची ही
शमवावी तू स्पर्शाने
माझ्या मिठीत गोडवा
विष मरते विषाने
ब्रम्ह मुहूर्तावर सोड
माझ्या योनीत बीज
बुध्दीसंपन्न चाणक्य
वारस देईल साज
कळ फेरतो कशाला
श्वास घे थोडा दमाने
हात माझ्या हातातूनी
काढ तू 'पण' धिराने

