चमत्कार...!
चमत्कार...!


चमत्कार घडला
माझ्यात फरक पडला
तुझा संग जडला
जन्म सार्थकी लागला
विचारपूस झाली
चार मंडळी जमली
अनुभव कनवटीचे
विचारू लागली
माझ्या दोस्ताचा
मी पत्ता दिला
त्यांना ही त्यांचा
लळा लागला
त्यांचेही कल्याण झाले
अच्छे दिन आपोआप आले
प्रयत्न सफल झाले
लक्ष्मीचे आगमन झाले
आज सारे त्याचे
गुणगान गातात
हवे हवे ते सारे
जीवनी मिळवतात
त्याच्या संगतीने
आनंदात राहतात
जो जो भेटेल
त्याला त्याचा पत्ता सांगतात
तुम्ही पण त्याची
मनापासून संगत करा
प्रगतीचा मार्ग धरा
त्याच्या संगे जीवन उन्नत करा....!!!