STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

3  

Prashant Shinde

Abstract

मागणे....!!

मागणे....!!

1 min
27.8K


मागणे रसिका

पुरवीन म्हणतो मी

शब्दा शब्दातूनी....

शमविल जी तहान

उचंबळून येणारी

मृगजळा पाहुनी....


नाहीतर फेडेन

पारणे डोळ्यांचे

सप्तरंगी जादुई

कुंचल्याच्या सफाईदार फटक्यातुनी...

तृप्ततील अनेक आत्मे

अंतरमनातील तृषा शमवूनी...


पहा रसिका उघड्या डोळ्यांनी

अन् निर्मळ अंतःकरणानी

स्वैर आविष्कार साकारला

प्रतिभांचा तुझ्याचसाठी

रे हा खेळ आत्मचिंतनाचा....!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract