सुख
सुख
मी सुखाची वाट पाहतो..
दु:ख माझ्या अंतरी...
सुखदु:खाचा लपंडाव हा..
ह्रुदयाच्या अंतरी...
कवेत घेतो छोटी स्वप्ने..
चालतो अधांतरी...
एकटाचं मग वैतागतो..
बसतो सागर तीरी...
आयुष्याची ही छोटी नौका..
तरंगते पाण्यावरी...
एकटाचं मग वल्हे मारितो..
वळवतो लहरींवरी...
जीवन म्हणजे गाणे असते..
आजही मी शोधीत राहतो...
स्वतःच्याच आठवणीत मग भरकटत मी राहतो..
सुखी जीवनाची वाट पाहत मग...
नवी स्वप्न मी पाहतो...
