राजे तुमचा विश्वास होता...
राजे तुमचा विश्वास होता...
राजे तेव्हा विश्वास होता तुमचा..
तुमच्या प्रत्येक मावळ्यावर..
आताचे मावळे वेगळेचं...
त्यांचं लक्ष मात्र पैशेवाल्या कावळ्यांवर...
आपल्याचचं रक्त वाहुन..
इथे आपल्याचाचं घात होतोय..
राजे तुमचं स्वराज्य नष्ट होतोय....
राजे आता उरलेतचं कुठे किल्ले..
उरलेत भग्न निवेश..
कधीच आठवण न येणाऱ्या पुतल्यांखाली बसतात तरुण...
परिधान करुन वेश..
तुमचं ऐश्वर्य,तुमचा इतिहास..
आता इतिहासजमाचं झाला आहे..
आठवुन गतकाळातलं वैभव मन उद्विग्न होतोय..
राजे तुमचं स्वराज्य नष्ट होतोय...
राजे पोकळ शिवभक्त म्हणणारे..
प्रत्यक्ष गड चढताना मात्र तुम्हालाचं घालतात शिव्या..
अन् वर चढुन मात्र मिरवतात फसफसणारी बियर..
तुमच्याचं किल्ल्यांवर रेखाटली जातात..
लैला मजनुंची नावे..
शोधतात एकांतातील जागा..
अन मांडतात अश्लिलतेचा बाजार..
तुमची रक्तरंजित माती मात्र आज रडतेय..
राजे तुमचं स्वराज्य नष्ट होतयं . . ,
