समुद्रकिनारी असल्यावर...
समुद्रकिनारी असल्यावर...
समुद्रकिनारी असल्यावर उगीचच वाटत ..
तुझा हात हातात घेऊन ..
एक उंच उडी मारावी ..
अगदी आभाळाला हात टेकेपर्यंत ..
अन स्वछंदपणे श्वास घ्यावा ..
तसं रेखाटलंय तुला वाळूवर ..
पण एक लाट तुझ्याच दिशेने येत आहे ..
तेव्हा एक समुद्र मंदस्मित करत माझ्यावर हसतोय ..
कारण आता सगळं पुसणार आहे ..
एकांतातल्या आठवणींसारखं ...

