आम्ही काव्यप्रवासी
आम्ही काव्यप्रवासी
आम्ही काव्यप्रवासी
प्रवास दूर नित्याचा
लेखनीच्या साथीनं
वेध घेतो भावनेचा
कल्पना अमुचा स्वभाव
उपमा अलंकार हा साज
आमच्या काव्य मैफिलीत
शिकतो सुखावतो समाज
नव नावीन्याच्या ओढीत
चालतो आमचा स्वास
गुंतागुंतीच्या पेचातील
आम्ही सोळवतो फास
सोळाव्या वयाचं तारुण्य
प्रतिभा नाचते धुंदीत
आमुच्या नव विचार
नसतात शब्दांच्या मंदीत
आम्हा हाती लई बळ
प्रतिभा शक्तीची छाव
सजीव निर्जीवाला सुंगून
जानतो त्यांच्यातील भाव
नव रसाचे पूजारी
काव्यात बसती जान
मानवतेला सदा पुजून
समाजाचा करतो सन्मान
दूर दृष्टीचे वरदान
सर्पाचे पाय मोजतो
आम्ही फक्त सांगू शकतो
मासा कसा झोपतो
सुर्याच्या तेजासंग
आमची मैत्री खास
चंद्राच्या शितलतेत
दरवळतो आमचा स्वास
सेवा भावाची वृत्ती
जीवन व्हावे आनंदीत
समाज मन फुलविण्या
काव्य प्रवास सदोदीत
