शेतकरी आंदोलन...
शेतकरी आंदोलन...
आमच्या पुढे नाही चालणार तुमचा हा वाईट धंदा.
हो आम्ही गरीब काबाड कष्टकरी खरा. रयतेचा पोशिंदा.
दिवस रात्र खपतो तुमची पोट भरायला.
भाव नाही नीट मिळत शेतमालाला तरी,
आम्ही पुन्हा जातो.
शेतात चिल्लर गोळा करायला..
सरकार हक्क मागतोय आम्ही
कष्टाची चेष्टा करून ,भीक देताय,शेतकऱ्याला.
शेतकरी आंदोलन हे जातीचं नाही ना?
माय मातीच आंदोलन आहे.
मातीच मोल मातीत झीजण्याराला कळतं
जातीत फूट पाडून मत मिळवण्याऱ्याला नाही..
म्हणे कांदा महाग झाला?
सांगा कोणता शेतकरी अंबानी बनला,
दीडकी तुडकीचा हिशोब देऊन
तूम्ही आम्हाला रडवताय.
कांदा सडवताय, तूर कीडवाताय.
न्याय देणार बळीराजाला म्हणून, पोटावर पाय पण देताय.
कर्जमाफीला कोरोना झाला.
डोस फक्त श्रीमंतालाच मिळाला.
खरा मातीचा भक्त गळ्यात दोरी अडकून लटकला.
पाऊस नाही पडला तर डोळ्याला झोप नाही लागत.
कधी वावराच्या भेगा कडे बघतो
तर कधी कोरडा ढगाला विनंती करतो
डोंगरा सारखा दिफाड काळजाचा
तुमच्या मुळे फाशी घेतो...
कित्येक कवींनी शेतकऱ्याबद्दल लिहिले आहे
आणि त्यांचा वारसा आम्ही विसरणार नाही..
आम्ही लढू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी.ते हि मरे पर्यंत...
आमच्या पुढे नाही चालणार तुमचा हा वाईट धंदा.
हो आम्ही गरीब काबाडकष्टकरी. खरा रयतेचा पोशिंदा.
