STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Thriller

4  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Thriller

भ्रम

भ्रम

1 min
26

खोट आश्वासन देत राहायचं स्वतःला 

हा सुद्धा एक भ्रम आहे 


टाचेवर जोर टाकून डोक्याला पैंजण बांधण्या इतक 

खुळ राहणं हा पण एक भ्रम आहे 


मेंदू विचार करतोय 

गळ्यात घुंगरू बांधून जिभेला फाशी द्यावी.


ही कला अवगत झाली 

खोट्या खुशीत खुश रहायची 


सहक निरुप नजरेचं चित्र 

डोळ्यावर हात ठेवून सगळ दिसतय बोलायचं 

हा पण एक भ्रम आहे 


हलक्या फुलक्या आयुष्याला बळकट छत्र 

पोकळ वासा आधार भक्कम 

हा पण एक भ्रम आहे

 

वेताळ मनात मदाळ प्रेम 

त्या प्रेमावर हक्क आहे माझा

हा पण निव्वळ भ्रम आहे


प्रत्येक शब्द गुलाम आहे 

मोकळे केले तर दुसऱ्या कवितेत 

तो शब्द मिळालेला आहे 


मी कवी आहे 

हा सुद्धा एक भ्रम आहे....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy