खरं लिहीन ...
खरं लिहीन ...


खरं लिहिन तर तुझा दुरावा लिहीन.
खोटं लिहीन तर तुला माझ्यात समाविन.
कहाणी खूप छोटीशी आहे,
काहींना काही लिहीन.
लिहिताना राग असेल,
अहंकार दूर केलास तर,प्रेम दिसेल.
जिथे अडकेन तिथे,
शब्द माझे असतील,
कवितेत धोक्का दिसेल,
तो,शब्द,शब्दांनी खुडीनं
लिहिताना हात काही वेगळं लिहिलं
मन फक्त तुझ्या,आठवणी लिहिलं
खरं म्हणजे पहिली भेट नाही लिहिणार.
खोटं म्हणजे ती आठवणं पुन्हा रडवणार.
उन,वारा, समुद्र, किनारा, मेघधारा,
सर्व आचार, विचार, सुविचार, लाचार, सगळे गिळून
एक, एक शहण रेखाटीन...
खोटं म्हणजे मी फक्त तुझं नाव लिहिण..
कविता काय लिहिऊ तुझ्यावर
थोडी वाट बघ मी तर ग्रंथचं लिहिण...
रॉयल फॅमिलीवाली,कहाणी नाही आपली,
जी आहे,तिला मातीचा सुगंध आहे,
जमीनवर पाय,जशी विनम्रता डोळ्यात उभी राही,
काही चुका लिहिणार.
भेट ते शेवट,
ते शेवट न भेट..
हे लिहिवून कविता फाडून टाकणार...