STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract Classics Fantasy

4.0  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract Classics Fantasy

बेवडा आहे बाप

बेवडा आहे बाप

1 min
145


आख्या दिवसा बरोबर अख्ख

 आयुष दारूत बुडत असतो.

असल्या बापा पेक्षा सहीतान चांगला?

 

अशा लोकांच्या प्रश्नांना मी उतर चोख देतो..

थोडा अज्ञान आहे मी रोख पण ठोक बोलतो.


हो पितो की दारू माझा बाप..

पण भिक नाही मागत


हातगाडी वाढतो

कष्ट करतो


चूल पेटावी म्हणून अजुन राबतोय

प्रेमानं जवळ घेतल नसल

पण दूर पण केलं नाही कधी 


हो आणि इजतीची चाकरी करतो

चोरी मारी करत नसतो

 चूक तो फक्तं दारू पितो


गरीबाची भटी सदा बदनाम असते

यांच्या वाईन चा वास येत नाही म्हणून


कधी रस्त्यात

पडतो

तर कधी नाल्यात धड पडतो 

रात्र झाली की घर चापचत चापचत परत येतो


याचा अर्थ जोमदारी वाऱ्यावर सोडत नाही

लढतय म्हातारं एवढं कटोर आहे की

दुखणा घेवुन स्वतःला जाळत असत

दिवस रात्र..


वाईट आहे ना

बेवडा बाप,

वाईटच आहे..

संस्कार चांगले परलेत 

नाहीतर मी पण भेवडा असतो


बेवडा बाप पाप नाही रे

वड आहे आणि त्यांची सावली

नागड्या उनाला ही आवरते..


बिंदास जगतो मी

बेधडक लोकात वावरतो मी

माझा पाठी असणाऱ्या सावली मूळे


धक्का देवून बुकीत आंबा पिकात नाही.

शेतात राबून आम्हाला जगवत आहे



Rate this content
Log in