अर्पण
अर्पण


हिन सोड वाहुरीच
मन रान काहुरीच
रचला हा दोष माझा
गुणगान दुश्मनाच
धग धग धगता देह
विजला हा गप्प गुमान
होता शत्रू कोणी आपलाच
मोर नाचे तो रानात.
भुके पोटी बाप्प राबे,
करपलेल्या त्या शेतात.
काय असा ठाव मांडावा,
नशिबानं, नशिबात.
हिन सोड वाहुरीच
मन रान काहुरीच
रचला हा दोष माझा
गुणगान दुश्मनाच
घर सार विकुरल
वाळविन पोकरल
देवाचा देव कळेल,
मायेच्या या पदरात.
थक झालं हे जगणं
गाव सोडला नाही
ठोकर खात जळतोय
अजुन उभा स्वर्गात.
हिन सोड वाहुरीच
मन रान काहुरीच
रचला हा दोष माझा
गुणगान दुश्मनाच