जिद्द..
जिद्द..


जिद्द ध्यानामनात आणि हृदयात
परस्थिती कमजोर आणि गरिबी खिशात.
रडलेल्या मैदानात लढण्याची ताकद
त्यालाच उराशी ठेवून जिद्द म्हणुन जगतोय
दिवसा ढवळा करपलीत स्वप्न..
तरी तोंडावर हासू ठेऊन धडपडतोय.
मिशी वर ताव मारत,
सुर्याचा पलेदा करून रात्र भर जागतोय.
ढेपाळलेत पाहून दगडी आणि धोड्याणा.
आरे पाझर पाजळतोय दरी आणि खोऱ्याना.
खळ खळ नाऱ्या झऱ्याचा आवज जसा मधूर आहे
तसें नजरेत भिडणारे हे मैदान रुड आहे
जसे जिवंत ज्वाला जणू.
झेप अशी घेतो..
की गरुड होऊन आभाळ भेदतो
शत्रु कापतो जेव्हा मी मैदानात उतरतो.
कष्टाच्या घामात डूबून
दुःखाचा दर्यात दुष्काळ पाडतोय .
जसा सु
ख्या जमिनीवर हिरवळ वाढतोय
नशा पाणी दुनियादारी नाही कोणती काळजात राणी.
आपण आपलं, आपलं नाही कोणी..
जीतण्यासाठी तरुणांयीचा उभा जीव घेतलाय.
बघा काड्या करणाराचा जीव कसा किकलाय .
ये बुध्दी बळाचा डाव मी वैऱ्यानच्या शाळेत शिकलोय
पैदयाला सोडून सरळ राजाला भिडलोय.
हे कवळा शेडा नाही,मुरलेल झाड आहे बघ
वनव्यात पेटून पुन्हा हिरव गार झालंय बघ
सापा सारखी कातडी टाकून,चित्या सारख धावतोय .
रोखून तर बघा...
कशा नरड्या सकट कोतळा बाहेर काढतोय..
रडलेल्या मैदानात लढण्याची ताकद
त्यालाच उराशी ठेवून जिद्द म्हणुन जगतोय.