राख
राख
माझी परी सोनुली
का शांत निजली
शब्द झाले मुके
प्राणज्योत विझली
कसं सांगू कस माझं
कोमेजलं लेकरू
कावळ्याच्या चोचीत सापडल
ते इवलंसं पाखरू
लचके त्यानं तोडले तिचे
जसा पिसाळलेला कुत्रा
जीवाच्या आकांताने ओरडली असेल
ती बाबा मला वाचवा
छिन्न विछिन्न देह तिचा
मनात लाही लाही
कळी पायाखाली चिरडली
त्याला जराही किव नाही
एवढ्यावर भागल नाही त्याच
तिचं डोकं दगडान ठेचल
होती थोडी धुगधुगी तर
रॉकेल टाकून जाळल
तिची राख ओरडून ओरडून
हेच सांगत आहे
पुढच्या जन्मी बाबा
मला मुलगा व्हायचं आहे..😔
